'लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं बारामतीकरांची झोप उडवली'

'लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं बारामतीकरांची झोप उडवली'

'लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं बारामतीकरांची झोप उडवली. जरा आणखी धक्का लागला असता तर वेगळा चमत्कार पाहायला मिळाला असता.'

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती 8 सप्टेंबर :  लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं बारामतीकरांची झोप उडवली. जरा आणखी धक्का लागला असता तर वेगळा चमत्कार पाहायला मिळाला असता असा टोला भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. पण त्यातून नाउमेद न होता 2024 च्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असंही ते म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बारामती जिंकणं हे भाजपच्या दृष्टीनं हवेतला दावा ठरेल असा पुनरुच्चारही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय. विधानसभेसाठी बारामतीची जागा कोणाला द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र ज्यांना कोणाला ही जागा मिळेल तिथे प्रचंड ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

उदयनराजे राजीनामा देणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले उद्या (सोमवार) खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबता थांबत नाही आहे. नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. गणेश नाईक येत्या 11 सप्टेंबरला भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बाप्पाच्या मंडपात नाचवल्या बारबाला..अश्लील गाण्यावर थिरकले रेल्वे अधिकारी!

दरम्यान, नवी मुंबईतील बेलापूर हा मतदारसंघ तसा गणेश नाईकांचा बालेकिल्ला. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने कधी नव्हे त्या भाजप पक्षाने ही उभारी घेतली आहे. पण आता नाईकांचेच कुटुंब भाजपत आल्याने स्वतः गणेश नाईक नेमके कधी भाजपमध्ये प्रवेश करणार त्यावर इथली उमेदवारी निश्चित होणार आहेत.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा बोलले छत्रपती संभाजीराजे, म्हणाले...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

'उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचं स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे. याआधीही संभाजीराजेंना उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी संभाजीराजेंनी उदयनराजे जर भाजपमध्ये जाणार असतील तर मी त्यांचं स्वागत करतो, असं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 11:12 PM IST

ताज्या बातम्या