शिवसेनेचा 'बाण' भात्यात.. चंद्रकांत पाटलांच्याच हस्ते होणार विठ्ठलाची महापूजा

शिवसेनेचा 'बाण' भात्यात.. चंद्रकांत पाटलांच्याच हस्ते होणार विठ्ठलाची महापूजा

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी मोठी चुरस सुरू आहे. 

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,6 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे विरोध करणारे पंढरपुरातील शिवसैनिकच महसूलमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत.

कार्तिकीच्या पूजेवरून शिवसेनेने घुमजाव केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करणार आहे. महापूजेचे वेळी शिवसेना महापूजेतही सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी मोठी चुरस सुरू आहे. पंढरपूरात शिवसैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या पूजेला मंगळवारी विरोध केला होता. मात्र, त्यानंतर आता खुद्द विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या समवेत महापूजेतही सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेनेने पंढरपुरात कार्तिकीच्या पूजेवरून घूमजाव करीत भाजपापुढे नमते घेतले असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटलांना कडाडून विरोध..

सध्याचे सरकार हे काळजीवाहू सरकार आहे. कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अपयशी ठरले आहेत. विठ्ठलाची शासकीय पूजा राज्यपाल अथवा एखाद्या विठ्ठल भक्ताकडून करावी, असे लेखी निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी मंदिर समितीला दिले होते.

मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कार्तिकीच्या धार्मिक सोहळ्यात शिवसेनेच्या भूमिकेमुळे वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, असे सांगितले आहे. शिंदे म्हणाले की संदीप केंदळे यांची भूमिका ही वैयक्तिक आहे. त्याचा शिवसेनेच्या भूमिकेशी संबंध नाही. त्यामुळे पंढरपुरात शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना विरोध नाही, असे संभाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या