जितेंद्र जाधव, बारामती 22 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आता त्याचे धक्के बसायला सुरुवात झालीय. निवडणुकीचा हिशेब फक्त एकमेकांचे विरोधकच नाही तर कार्यकर्त्येही चुकते करायला लागले आहेत. आपल्याच पक्षाशी गद्दारी केली असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी मारहान करत त्याची गावातून धिंड काढली. पक्षाचं तिकीट मिळूनही निवडणुकीच्या आखाड्यात जोमाने न लढता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना मदत केली असा त्यांच्यावर आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. अशोक अजिनाथ माने यांना बसपाची उमेदवारी मिळाली होती. पण अशोक माने यांच्या निवडणुकीतील वर्तनाबद्दल बसपाच्या कार्यकर्त्यांना संशय होता. अशोक माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक न लढवता अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट!
माने यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्याचा कार्यकर्त्यांना राग आला. त्यानंतर माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र उमेदवारी पक्की झाल्यामुळे त्यांचं नाव कायम राहिलं. कार्यकर्त्यांनी प्रचारही केला या सर्वांना राग आल्याने कार्यकर्त्यांनी माने यांना मारहान केली. त्यांचे कपडे फाडले आणि तोंड काळं करत त्यांची धिंड काढली.
मुंबईत संतप्त जमावाने पोलिसांवर उचलला हात, पाहा हा VIDEO
बारामतीत भाजपने वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी दिल्याने चुरस वाढली होती. तर अजित पवारांनी राज्यभर प्रचार करत बारामतीचा गढ सांभाळला होता. अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय प्रचारात गुंतले होते. तर शरद पवार यांनीही सभा करत मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबद्दल काही वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता.