धक्कादायक: लग्न करायला आलेल्या नवरदेवाचा खून, करमाळ्यातील घटना

धक्कादायक: लग्न करायला आलेल्या नवरदेवाचा खून, करमाळ्यातील घटना

लग्न करायचे म्हणून अहमद शेख व राजेंद्र पेठे यांनी उस्मानाबाद येथे सोने खरेदी करून लग्नासाठी आले होते.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

करमाळा,7 डिसेंबर: लग्न करायला आलेल्या नवरामुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भोगेवाडी येथे घडली आहे. अहमद शेख असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील अहमद शेख याच्यासाठी मित्र राजेंद्र पेठे यांनी ऑनलाइन नवरी बघितली होती. मागील तीन-चार दिवसांपासून राजेंद्र पेठे यांचे संबंधितांशी फोनवर बोलणे सुरू होते. लग्न करायचे म्हणून अहमद शेख व राजेंद्र पेठे यांनी उस्मानाबाद येथे सोने खरेदी करून लग्नासाठी आले होते. नवरीमुलगी आहे, त्या ठिकाणी तुमची कार त्याठिकाणी जाणार नाही. असे अहमद शेख आणि राजेंद्र पेठे यांना सांगण्यात आले. गाडी कुर्डुवाडी येथे लावून आमच्या मोटार सायकलवर जावे लागेल, असेही त्यांना संबंधितांनी सांगितले. दोघांना मोटारसायकलवर बसवून माढा तालुक्यातील भोगेवाडी येथील माळरानावर आणून लग्नासाठी त्यांच्याजवळील पैसे सोने घेऊन मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अहमद शेख या नवरदेवाचा मृत्यू झाला. राजेंद्र पेठे हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबतची माहिती भोगेवाडी गावचे पोलीस पाटील सुरेश काळे यांनी याबाबतची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जागेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अहमद शेख यांच्याबरोबर आलेल्या राजेंद्र पेठे याने दिलेल्या तक्रारीवरून असून टेंभुर्णी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या