शेतात गेले होते आई-वडील... संधी साधून नराधमाने 6 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार

शेतात गेले होते आई-वडील... संधी साधून नराधमाने 6 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार

आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होताना दिसला.

  • Share this:

अहमदनगर, 12 सप्टेंबर: पाथर्डी तालुक्यात सहा वर्षाच्या चिमुरडीवर 14 वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना घडली आहे. पीडित चिमुरडी पहिलीत तर आरोपी मुलगा सातवीत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (10 सप्टेंबर) ही घटना घडली. पीडितेचे आई-वडील शेतात गेले होते. हीच संधी साधून आरोपीने मुलीवर अत्याचार केला. आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होताना दिसला. बुधवारी सकाळी खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर तिला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाविरुद्ध बालकांचे संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी पुढील तपास करत आहेत.

13 वर्षांच्या मुलीवर चौघांनी केला आळीपाळीने बलात्कार

दरम्यान, अशीच एक घटना राज्याची उपराजधानी नागपुरात घडली आहे. 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केली. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात ही घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले..

याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (वय-18), बलवंत गोंड (वय-22) यांच्यासह दोन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले असल्याची माहिती मिळाली आहे.

शौचास गावाबाहेर गेली होती पीडिता..

मिळालेली माहिती अशी की, रविवारी (8 सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. नंतर तिला गावात आणून सोडले.

SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या