लग्नानंतर पहिल्यांदाच साई दर्शनाला आलेल्या राणी मुखर्जीला अश्रू अनावर

लग्नानंतर पहिल्यांदाच साई दर्शनाला आलेल्या राणी मुखर्जीला अश्रू अनावर

'दर्शन घेताना मला भरून आलं. नेमकं काय झालं ते माझ्यात आणि बाबांमध्येच राहू द्या. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही.'

  • Share this:

हरिष दिमोटे, शिर्डी 16 डिसेंबर : बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आज शिर्डीत आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच राणी मुखर्जी शिर्डीत बाबांच्या दर्शनाला आली होती. शिर्डीत आल्यानंतर राणी मुखर्जी थेट मंदिरात आली आणि तिने बाबांचे दर्शन घेतले. बाबांसमोर हात जोडून उभे राहिल्यानंतर राणी मुखर्जींने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दर्शन घेताना ती अतिशय भावुक झाली होती. दर्शन घेतल्यानंतर जेव्हा तिला पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा राणी म्हणाली. दर्शन घेताना मला भरून आलं. नेमकं काय झालं ते माझ्यात आणि बाबांमध्येच राहू द्या. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. राणी पुढे म्हणाली, नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी राणी मुखर्जी हिने उपस्थिती दर्शवल्यानंतर तिने साई समाधी दर्शनाचाही लाभ घेतला. साईबाबांनी दर्शनासाठी बोलावलय त्यामुळे येण शक्य झालं.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचा विश्वासघात केला, नारायण राणेंचा 'प्रहार'

बाबांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळतो. बाबांच्या आशीर्वादाने विवाह झाला त्यानंतर एक मुलगीही झाली त्यामुळे बाबांना धन्यवाद देण्यासाठी मी आलेय. माझ्या डोळ्यात दर्शनावेळी जे आश्रू आले ते मला आणि बाबांनाच माहित आहेत. असं सांगत राणीने त्याबद्दल अधिक भाष्य करण्याचं टाळलं. राणी मुखर्जीची शिर्डीत दहा गुंठे जागाही आहे तेथे घर बांधण्याची तिची अनेक दिवसांपासुनची इच्छा होती. तिथे घर कधी बांधणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच तुम्हीच त्याकरीता बाबांकडे प्रार्थना करा अस राणीने म्हटलंय.

दरम्यान राणीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी तिच्यासोबत फोटो , सेल्फीही काढले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी साईबाबांची मूर्ती आणि नव वर्षाचं कॅलेंडर देऊन राणीचा सत्कार केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या