एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही; चंद्रकांत पाटलांची कबुली

एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही; चंद्रकांत पाटलांची कबुली

चंद्रकांत पाटलांनी सोलापुरात सांगितले महाराष्ट्रात भाजपची सत्ता न येण्याचे कारण...

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,13 डिसेंबर: एकोप्याने वागलो नाही म्हणून राज्यात भाजपचे सरकार आले नाही, अशी कबुलीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करू नका. रोज उठून पक्षविरोधी बोलले तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा परळीतील मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना दिला आहे. केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण आहे. पक्षाविरोधातील कारवाया खपवून घेतल्या जात नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

अंतर्गत वाद चव्हाट्यावर...

दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी परळीत पंकजा मुंडे यांनी समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह एकनाथ खडसे, प्रकाश मेहता व अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना पंकजा व खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला होता. एवढेच नाही तर एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना इशारा दिला.

पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर नाराज..

चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. परळीच्या मेळाव्यात काहींनी बंडाची भाषा केली. मतभेद असायला पाहिजेत. पण ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. त्यातून मार्ग काढता येईल. बंड केल्याशिवाय न्याय मिळत नाही, असेही पाटील म्हणाले.

परळीत काय म्हणाल्या पंकजा..

भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर मोठी सभा घेतली. चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षावरील नाराजी बोलून दाखवली. खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर घणाघात आरोप केले. नंतर पंकजा यांनीही मन मोकळं केलं. त्या म्हणाल्या, मन मोकळं केलं नाही तर शरीरात त्याचं विष बनतं. आपण पक्ष सोडून जाणार नाही, हे स्पष्ट करताना पंकजा यांनी एक मोठा इशाराही दिला. मी पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. चेंडू आता भाजपच्या कोर्टात आहे, असे सांगताना त्या म्हणाल्या, मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं. भाजप सोडणार नाही, असं सांगत असतानाच त्यांनी 26 जानेवारीला गोपिनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय मुंबईत सुरू करणार असल्याची घोषणा केली. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार, असेही पंकजा यांनी यावेळी जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या