भाजप आमदाराने केला जमावबंदीच्या आदेशाचा भंग, गुन्हा दाखल

भाजप आमदाराने केला जमावबंदीच्या आदेशाचा भंग, गुन्हा दाखल

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 80 कार्यकर्त्यांविरोधात भुईंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

सातारा,22 डिसेंबर: साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 80 कार्यकर्त्यांविरोधात भुईंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी 18 डिसेंबरला आंदोलन करुन पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता.

दिला होता अल्टिमेटम...

आमदार शिवेंद्रराजे यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. 15 दिवसांच्या आत प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवा, खड्डे बुजवा नाहीतर टोल बंद पाडू असा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन करत आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खळ्ळखट्याक आंदोलन होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असल्याची तक्रार सामान्य प्रवासी करत आहेत. त्यानुसार आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले होते. वर्षभरापासून सातारा-पुणे महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने अखेर शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट आनेवाडी टोलनाक्यावर मोर्चा नेला. भोसले समर्थकांनी यावेळी टोल वसुली बंद करत नाक्यावरील वाहने पैसे न घेता सोडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी वाहन चालकांना टोलनाक्यावर गुलाबाचे फुलही दिले होते.

सातारा-पुणे महामार्गाबाबत आज झालेल्या टोल नाक्याच्या आंदोलनात शिवेंद्रराजे यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. यात त्यांनी महिनाअखेरीपर्यंत सातारा-पुणे रस्त्यावरील मुख्यरोड आणि सर्विस रोडवरील खड्डे बुजवणार असल्याचे लेखी आश्वासन घेतले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या