मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!

फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, ते झपाटल्यासारखं काम करताहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 02:52 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!

संदीप राजगोळकर, जत 10 ऑक्टोंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आज जतमध्ये सभा झाली. या सभेत अमित शहांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आणि शरद पवारांवरही टीका केली. भाजपचे उमेदवार  विलासराव जगताप यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री अहोरात्र झटत आहेत. मला रात्री 12 वाजता फोन आला की मी समजतो हा देवेंद्र फडणवीसांचाच फोन आहे असा किस्साही त्यांनी सांगितला.

शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षित भारत तयार केलाय तर फडणवीस विकसित महाराष्ट्र तयार करताहेत. फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, रात्री 12 वाजता फोन आला की मला समजत की फडणवीस यांचा फोन असेल. सध्या महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले.

'भाजपनं माझं तिकीट का कापलं असावं?' विनोद तावडेंनी व्यक्त केली खंत

ते पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी ची अवस्था अतिशय वाईट आहे. 70 वर्षांच्या राजकारणात 370 कलम कुणी हटवलं नाही. 370 हटवून देशाला अखंड ठेवण्याचे काम मोदींनी केलं. सरदार पटेल यांचे स्वप्न साकार झालं. 370 हटवायला काँग्रेस राष्ट्रवादीने विरोध केला होता. 370 कलम हटविण्याबाबात तुमची काय भूमिका आहे ते शरद पवारांनी जाहीर करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

पवार कुटुंबीय आणि भाजप प्रवेश, चंद्रकांत पाटलांनी केला खळबळजनक दावा

Loading...

बालकोट हल्ला बाबत विरोधकांनी पुरावा मागून काय साध्य केलं असा सवाल त्यांनी केला. JNU मध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना जेल मध्ये पाठवायचं की नाही? राहुल गांधी यांनी आमच्यावर टीका करावी, पण देशाचे तुकडे करतो म्हणाऱ्यांना पाठिंबा देऊ नये. बांगलादेश जेव्हा निर्माण झाला तेव्हा इंदिरा गांधी यांचे पहिले अभिनंदन वाजपेयींनी केलं होतं याची आठवण अमित शहांनी करून दिली.

काश्मीर शांत आहे, गोळी चालवली गेली नाही 370 हटवल्यानंतर UN मध्ये मोदी गेले तिथंही त्यांचं कौतुक झालं. आज पाकिस्तान एकटा पडलाय आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...