Home /News /maharashtra /

खासदार उदयनराजेंची अशीही जादूची छप्पी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

खासदार उदयनराजेंची अशीही जादूची छप्पी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

खासदार उदयनराजेंना राजकीय व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक फिल्मी गाणी म्हणतानाही अनेकांनी पाहिले असेल.

    सातारा, 30 डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapti Shivaji Maharaj) 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) हे नेहमी आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे नेहमी चर्चेत असतात. बाईक रायडिंग असो वा कार रायडिंग करतानाचे त्यांचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) याआधी चांगलेच गाजले आहेत. आता मात्र, जादूच्या छप्पीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क वासुदेवाला जादूची छप्पी दिली. हेही वाचा...कोरोनामुळे आणखी वाढली चिंता! उद्धव ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय अन् उदयनराजेंनी धरला ठेका... खासदार उदयनराजेंना राजकीय व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक फिल्मी गाणी म्हणतानाही अनेकांनी पाहिले असेल. मात्र त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. उदयनराजेंनी चक्क वासुदेवाने गायलेल्या गाण्यावर ठेका धरतं गाण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे वासुदेवानं गायलेले गाणं उदयनराजेंना इतकं आवडलं की त्यांनी गाणं संपताच आनंदाच्या भरात त्यांनी वासुदेवाला एक जादूची छप्पी दिली. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे राजे अशी खासदार उदयनराजे यांची ओळख आहे. उदयनराजे यांनी दिलेल्या या जादूच्या छप्पीमुळे कलेची कदर करणारे राजे असंही त्यांचं अनोखं रूप सर्वांना पाहायला मिळालं असंही जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. 'दुभंगलेली मनं पुन्हा कधीही जुळून येत नाहीत' असं सांगत उदयनराजे यांनी गावकऱ्यांना भावनिक साद घातली होती. हेही वाचा...महिलेचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांनी उंदरांना धरलं जबाबदार येत्या 15 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे असं आश्वासनच उदयनराजे यांनी दिले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या