शरद पवारांवर पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल विचारताच उदयनराजे म्हणाले...

शरद पवारांवर पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल विचारताच उदयनराजे म्हणाले...

उदयनराजेंनीही आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा, 30 जून : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. या वक्तव्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली. त्यामुळे आधी राष्ट्रवादीत असणारे आणि आता भाजपकडून राज्यसभेत खासदार असणारे उदयनराजे भोसले नक्की काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजेंनीही आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'भाजप नेते गोपीचंद पडळकर हे मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील,' अशी खोचक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर उदयनराजे यांना प्रश्न केला असता त्यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपमधूनच पडळकरांचा निषेध

शरद पवारांवर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा राष्ट्रवादीसह भाजपमधूनही निषेध करण्यात येत आहे. भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी पत्र लिहून शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या पत्रात त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल दु:ख व्यक्त केले.

गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दु:ख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवरील टीका ही दुर्दैवी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 30, 2020, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading