भाजप खासदाराकडून शरद पवारांचे कौतुक, म्हणाले 'ते' भाषण मतदारांना भावले

राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुजय यांनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 07:57 PM IST

भाजप खासदाराकडून शरद पवारांचे कौतुक, म्हणाले 'ते' भाषण मतदारांना भावले

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,30 ऑक्टोबर: भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी केलेल्या भाषणामधील मुद्दे मतदारांना भावले. महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी मोठे योगदान दिले आहे. शरद पवार यांनी केलेले भाषण त्यातून मांडलेले मुद्दे मतदानदारांना पटलीत. त्यामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्रात यश मिळाले. मात्र, भाजप कुठेही कमी पडलेली नसल्याचे खासदार सुजय विखेंनी सांगितले आहे.

पवार साहेबांचा करिष्मा चालला..

लोकसभा निवडणुकात मिळालेल्या यशानंतर नगर जिल्ह्यात बारा विरुद्ध शून्यचा नारा कार्यकर्ते आणि उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, अशी सारवासारव खासदार सुजय विखे यांनी बुधवारी नगरमध्ये केली. जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत. मात्र, त्याचबरोबर पक्षाला मिळालेल्या अपयशाची कारणमिमांसा आम्ही तालुका पातळीवर करणार असून मी स्वतः खासदार या नात्याने पक्षाला त्याचे उत्तर देईल, असेही खासदार सुजय यांनी यावेळी स्पष्ट केले. राम शिंदे यांच्यासह तीन विद्यमान आमदारांसह सहा उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्यापर्यंत नाही. आम्ही पडापाडीचे राजकारण केले, असे कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ, मात्र आमदार राजळे,आमदार पाचपुते यांनी स्वतः राधाकृष्ण विखे यांना भेटून आभार मानले आहेत, असा निर्वाळा देत खासदार सुजय यांनी पराभूत भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा चर्चेचे खंडन केले.

पवारांच्या भाषणांचा धडाका राष्ट्रवादीच्या कामी आला..

Loading...

राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुजय यांनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यांनी मनमोकळेपणाने कौतुकही केले. पवार साहेबांनी राज्यभर केलेला सभांचा तडाखा मान्य करावा लागेल, त्यामुळेच राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.

VIDEO:'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 07:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...