शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला एकनाथ खडसेंचा पाठिंबा?

शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला एकनाथ खडसेंचा पाठिंबा?

भाजपच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेल्या एकनाथ खडसे यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मनातली खदखद अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली

  • Share this:

हरीश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी, 6 नोव्हेंबर: शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला आहे. एकनाथ खडसे हे बुधवारी शिर्डीत साईदरबारी आले होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यादेखील होत्या. कायम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेल्या एकनाथ खडसे यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मनातली खदखद अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आहे. खडसे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, सत्ता स्थापनेवरून तसेच मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा राहिलेलो नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्षात काय ठरले होते, याबाबत कल्पना नाही. त्यावर भाष्य करणेही त्यांनी टाळले. मात्र, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं, असे सांगत राज्यात महायुतीचे सरकार येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राजकारणापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. त्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. खडसेंची नाराजी समोर आल्यानंतर पक्षाने त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, रोहिणी यांचा पराभव झाला.

VIDEO : सत्ता स्थापनेसाठी भाजपचे एक पाऊल पुढे, मुनगंटीवारांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या