भाजपमध्ये 'पुन्हा' इनकमिंग, महाडिक बंधूंच्या पक्षांतराने राजकारण बदलणार

भाजपमध्ये 'पुन्हा' इनकमिंग, महाडिक बंधूंच्या पक्षांतराने राजकारण बदलणार

इस्लामपूरसह परिसरात महाडिक यांचे मोठे प्रस्थ आहे.

  • Share this:

कोल्हापूर,23 डिसेंबर: विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने कौल दिलानंतरही भाजपला सत्तेपासून लांब राहावे लागले. असे असताना भाजपमध्ये 'पुन्हा' इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या बंधुंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इस्लामपूरसह परिसरात महाडिक यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे महाडिक बंधुंच्या भाजप प्रवेशाने इस्लामपूरमधील राजकारण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. हिवाळी अधिवेशनात सरकारने केवळ औपचारिकता पार पाडली. चर्चा केली नाही. प्रश्नांना उत्तरे दिले नाहीत. मंत्र्यांनी 3-3 मिनिटांत उत्तर देऊन वेळ मारून नेल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. दोन्ही काँग्रेसच्या जीवावर सत्ता स्थापन करणार? बाळासाहेब यांना असा शब्द दिला होता का? असा सवाल करत त्यावेळचे उद्धव आज नाहीत, असा टोलाही लगावला.

फडणवीस म्हणाले, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, पण सरकारने नया पैशाची मदत जाहीर केली नाही. आज अवकाळी ग्रस्तांना कर्जमाफी गरजेची होती. त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही आहे. ही योजना उधारीची आहे. सकल उत्पन्नात राज्याची अवस्था चांगली आहे. तसेच राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. सकल उत्पनाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे, 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 10:38 AM IST

ताज्या बातम्या