पुण्यातल्या जागावाटपावरून 'युती'त पडणार ठिणगी? सर्वच जागांवर भाजपचा दावा

पुण्यातल्या जागावाटपावरून 'युती'त पडणार ठिणगी? सर्वच जागांवर भाजपचा दावा

पक्षश्रेष्ठी ठरवतील तो निर्णय बंधनकारक असला तरी पुण्यातल्या सर्व जागा भाजपलाच मिळाव्यात असा सर्व स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 29 ऑगस्ट : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. भाजप आणि शिवसेना युतीचं पक्क असलं तरी जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे विभागात सध्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. सर्व 8 जागांसाठी भाजप मुलाखती घेत असून या सर्व जागा भाजपलाच मिळायला पाहिजे असं मत भाजपच्या नेत्या माधुरी मिसळ यांनी व्यक्त केलंय. पक्षश्रेष्ठी ठरवतील तो निर्णय बंधनकारक असला तरी पुण्यातल्या सर्व जागा भाजपलाच मिळाव्यात असा सर्व स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. आणि या आठही जागा सध्या भाजपकडे आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढून या जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे यावेळी जागावाटप कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावरून युतीत ठिणगी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. या सर्व जागांसाठी भाजपच्या मुलाखती सुरू असून 8 जागांसाठी 103 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ, 'वंचित' देणार धक्का!

उध्दव ठाकरे म्हणातात आमचं ठरलं

विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. स्वबळावर लढलं तर भाजपला बहुमत मिळेलं असं काही सर्व्हेत स्पष्ट झाल्यानं भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचंही बोललं जाऊ लागलंय. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय. शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती आणखी भक्कम कशी करायची तेच ठरवायचं आहे असं त्यांनी आज स्पष्ट केलं.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनी शिवसेने प्रवेश घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, युतीच्या मनोमिलनावर प्रश्न चिन्हं उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. युतीची घोषणा वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये झाली तेव्हा सगळ्या जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या. आमचं ठरलेलं आहे, त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या