गाई-म्हशींच्या दानाने पूरग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!

गाई-म्हशींच्या दानाने पूरग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!

कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या महापूरात पीकांची हानी न मोजता येणारी होती. पण शेतकऱ्यांना सगळ्यात चटका लावून गेला तो जनावरांचा मृत्यू.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड 26 ऑगस्ट : महापूराने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले. शेती वाहून गेली. डोक्यावरचं हक्काचं छप्पर उडालं. घरातलं होतं नव्हतं ते सगळं भिजून गेलं. सगळ्यात जास्त परवड झाली ची गुराढोरांची. हा सगळा परिसर दुध-दुभत्यांचा आहे. शेकडो शेतकऱ्यांच्या उपजिविकेचं ते साधन आहे. या महापूरात तब्बल 9 हजार जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांचं उपजिविकेचं साधनच हिरावलं गेलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून मदत आली. या मदतील भोसरीकरांनीही आपला वाटा उचलला. त्यांनी केलेली मदत मदत ही अनोखी असून ही मदत आहे ती पशुधनाची. या अनोख्या मदतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत ही मदत केली आहे.

बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या महापूरात पीकांची हानी न मोजता येणारी होती. पण शेतकऱ्यांना सगळ्यात चटका लावून गेला तो जनावरांचा मृत्यू. जीवापाड प्रेम केलेलं पशुधन गेल्यानं शेतकऱ्यांना धक्का बसला. यातली बहुतांश जनावरं ही दुभती असल्याने शेतकऱ्यांसाठी ती सर्वात मोठी हानी आहे. पूरग्रस्तांना अन्य धान्यांची मदत मिळाली मात्र पशुधनाची मदत फारशी मिळत नाही त्यामुळे भोसरकरांनी एकत्र येत 300 गाई-म्हशींचं दान करण्याचा निर्णय घेतलाय.

ह्या विशेष मदतीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील दूध विक्रेते असलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळालीय.

सुप्रिया सुळेंच्या 'संवाद' यात्रेला छगन भुजबळांची दांडी!

दूध हे तत्काळ पैसे देणारं साधन असल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे. त्यामुळे ह्या उपक्रमाचा सर्वत्र कौतूक केलं जातंय. आणखी अधिक गरजू पूरगस्ताना गोधनाची गरज भासल्यास त्यांनी सचिन लांडगे यांच्याशी 7385909061 संपर्क साधन्याचं अहवानही करण्यात आलंय. पूर ओसरल्यानंतर आता खरं आव्हान सुरू झालं असून पुनर्वसन आणि हजारो संसार उभे करण्यासाठी सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते या भागात अहोरात्र झटत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading