मराठी-कानडी वाद चिघळला, कोल्हापुरात शिवसैनिकांना बंद पाडली कन्नड मुव्ही

मराठी-कानडी वाद चिघळला, कोल्हापुरात शिवसैनिकांना बंद पाडली कन्नड मुव्ही

अप्सरा थिएटर येथील चालू असलेली 'अवणे श्रीमनारायन' ही कन्नड फिल्म युवासैनिकांनी थेटरमध्ये घुसून बंद पडली.

  • Share this:

कोल्हापूर,29 डिसेंबर: कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात मराठी-कानडी वाद आता चांगलाच चिघळला आहे. भीमाशंकर पाटील यांची गोळ्या घालण्याची भाषा, माजी मंत्री बसवराज यांचे वादग्रस्त वक्तव्य, नंतर बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याचे प्रकरणाचे रविवारी पडसाद उमटले आहे. शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. अप्सरा थिएटर येथील चालू असलेली 'अवणे श्रीमनारायन' ही कन्नड फिल्म युवासैनिकांनी थेटरमध्ये घुसून बंद पडली.

दुसरीकडे, कोल्हापूर बसस्थानकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. विशेष म्हणजे कर्नाटकातील नागरिकांच्या हस्ते हा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरच्या बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनावेळी कर्नाटक सरकार आणि कानडी संघटनांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासूनच कोल्हापूर-बेळगाव म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही बससेवा बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे.

कोल्हापूर कानडी संघटनांना शिवसैनिकांचे प्रत्युत्तर कोल्हापूरमधील कानडी फलकांना काळे फासले. अनेक दुकानांवर कानडी भाषेत फलक महामार्गावर अनेक धाब्यावरही कानडी भाषेतील फलक शिवसैनिकांनी हटवले. दरम्यान, मराठी फलकांवर बेळगावमध्ये शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली होती.

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बससेवा बंद करण्यात आली आहे. सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या आदेशानुसार बससेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे.

बेळगावमध्ये धिंगाणा..

कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही कन्नड रक्षण वेदिका संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी (29 डिसेंबर) महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. युवा समिती पदधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, समितीप्रेमी नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शिवसैनिकांचं कन्नड संघटनेला जशास तसे उत्तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून भाजप-शिवसेनेत जुंपली आहे. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये उमटले आहे. सेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला होता. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि पुतळ्याला काळी शाई फासली.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत कर्नाटक सरकारचा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 29, 2019, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading