Home /News /maharashtra /

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र, अहमदनगर जिल्हा बँक निकालानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र, अहमदनगर जिल्हा बँक निकालानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व आहे.

    अहमदनगर 21 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Ahmednagar Bank Election) निकाल रविवारी जाहीर झाला. 21 जागांपैकी 17 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे चार जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व नसलं तरी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं वर्चस्व आहे हे बँकेच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विजय पाटलांना शह दिला आहे. आता या निवडणूकीवर थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात म्हणाले, की शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा उपक्रम या बँकेने केला आहे. यावेळी आम्ही राजकारण विरहित निवडणूक केली आहे. 4 जागांपैकी केवळ एका जागेवर आम्हाला समाधानकारक निकाल मिळाला नाही. पदाधिकारी निवड प्रक्रियेत सगळे एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. सोबत बाळासाहेब थोरात म्हणाले, की जिल्ह्यात सगळ्यांकडे साखर कारखानदारी आहे. जिल्हा बँकेत आम्ही राजकरण करत नाही. शेतकऱ्यांबाबत बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र आहे आणि ते आम्ही टिकवतो. महविकास आघाडीने राधाकृष्ण विखे यांची कोंडी केल्याने जिल्हा बँकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवाजीराव कर्डिले अंबादास पिसाळ या दोघांच्या जागांवर सर्वांचं लक्ष लागून होते, तर प्रस्थापित नेत्यांनी मला आटोकाट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदार संघातून अंबादास पिसाळ हे निवडून आलेले आहेत. त्याठिकाणी आमदार रोहित पवार यांनीही निवडणूक हातात घेतली होती. मात्र मतदारांनी मला निवडून दिले आहे. या निवडणुकांमध्ये विकास आघाडीचे वर्चस्व नसलं तरी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व बँकेच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विजय पाटलांना शह दिलाय. एकूण जागा -  21, 17 बिनविरोध,  4 जागांसाठी निवडणूक आज निवडून आलेले - शिवाजीराव कर्डीले, आंबदास पिसाळ, प्रशांत गायकवाड, उदय शेळके बाळासाहेब थोरांतानी राज्यातील कोरोना स्थितीवरही प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊन लागू नये असं वाटत असेल तर शिस्तीचं पालन करावे लागेल, असं थोरात म्हणाले. लग्नात होणारी गर्दी, भाजी बाजार, प्रवासात गर्दी यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सचं पालन हे नियम पाळले तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ahmednagar, Balasaheb thorat, Bank

    पुढील बातम्या