B.Techच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, रॅगिंग झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

B.Techच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, रॅगिंग झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

हॉस्टेलमधल्या रुममधल्या मुलांचं आणि धर्मराजचं भांडण झालं होतं. त्यानंतर तो अस्वस्थ होता.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 26 ऑगस्ट : हातकणंगले (तिरसंगी) येथील डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच्या B Tech (Bachelor of Technology)च्या शेवटच्या वर्षात  विद्यार्थ्याने आत्महत्या केली. धर्मराज दत्तात्रय इंगळे असं या तरुणाचं नाव आहे. धर्मराज हा मंगळवेढा तालुक्यातील अकोला या गावचा होता. कॉलेजमध्ये आपला अपमान होतो असं धर्मराज म्हणत असे. त्यामुळे रॅगिंगला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील आकोला येतील अल्पभूधारक शेतकरी असणाऱ्या इंगळे कुटूंबावर या घटनेमुळे मोठा आघात झालाय. गरीब परिस्थिती असतानाही मुलाला पालकांनी शिकवलं. मुलाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने कोणाकडे बघायचे असा प्रश्न धर्मराजचे आई वडील विचारत आहेत.

खळबळजनक! मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

धर्मराज हा गेल्या चार वर्षापासून हातकणंगले येथील डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असून सध्या तो बी. टेक च्या शेवटचा वर्षात शिकत होता. गॅदरिंग नंतर रूम मधील मुलांची व धर्मराजचे काही तरी बिनसले होते तेंव्हा तो घरी परत आला होता व कॉलेजला जायचे नाही असे म्हणत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. या प्रकरणामुळे  त्याचे कुटुंब त्यांच्यावर लक्ष  ठेऊन होते. परंतु त्यांने घरच्याचे लक्ष चुकवून पहाटे बागेत फवारन्यासाठी आणलेले विषारी तननाशक प्राशन केले. मंगळवेढा येथून सोलापुरात उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मंगळवेढा पोलिसांकडे त्याचा मेडिकल रिपोर्ट पाठवण्यात आला असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

SPECIAL REPORT : सोनं अचानक इतकं महाग का झालं?

अभ्यासात हुशार असेलेल हाताशी आलेल पोर अचानक आत्महत्या करण्यामागे कॉलेज मध्ये त्याला सहकार्यांनी दिलेला त्रास आहे असा इंगळे कुटुंबीयांचा आरोप आहे. सर्व इंगळे कुटुंबीय अकोले गावात शेतावरील वस्तीवर राहतात. घरातील मुलांमध्ये धर्मराज तसा सगळ्यात हुशार त्यामुळे त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा असताना असे अचानक घडल्याने संपूर्ण कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या