• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापूर जिल्ह्यात केबल वॉरचा भडका, केबल ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यात केबल वॉरचा भडका, केबल ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा केबल वॉर सुरू झालं आहे. गगनबावडा तालुक्यात एका केबल ऑपरेटरवर खुरप्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 11 फेब्रुवारी - कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा केबल वॉर सुरू झालंय का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यातील बालेकरवाडी जवळ संतोष जाधव या केबल ऑपरेटरवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सात अज्ञात लोकांनी खुरप्याने हल्ला केल्याची ही घटना आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये तिसंगी इथं संतोष जाधव हे केबल ऑपरेटरचं काम करतात. सोमवारी संध्याकाळी ते बालेकरवाडी जवळ केबल जोडण्याचं काम करत होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही अनोळखी लोक आले. संतोष आणि अनोळखी लोकांमध्ये त्यावेळी वादावादी झाली आणि यातूनच संतोष जाधव याचा केबलने गळा आवळण्याचाही प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. त्याच वेळेला दोन अज्ञातांनी संतोष याच्यावर खुरप्यानेही वार केला. संतोषने आरडाओरडा करताच घटनास्थळी काही नागरिक जमा झाले. त्यामुळे अज्ञात हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती गगनबावडा पोलिसांना दिल्यानंतर दोन तासांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला नकार दिल्याचा आरोप यावेळी संतोष याच्या नातेवाईकांनी केलाय. गंभीर जखमी झालेल्या संतोष याला तत्काळ कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये संतोष यांच्या बाबतची तक्रार पोलिंसानी दाखल करून घ्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास करत असून अजूनही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाहीय. तर संतोष याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी संतोष याच्या नातेवाईकांनी केली आहे. कोल्हापूर : भाचा जिंकला म्हणून मामानं केला हवेत गोळीबार, पाहा VIDEO
Published by:Manoj Khandekar
First published: