महिला अत्याचारावर चिंतातूर असलेल्या अण्णांचे 'मौनव्रत'

महिला अत्याचारावर चिंतातूर असलेल्या अण्णांचे 'मौनव्रत'

न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,20 डिसेंबर: दिल्लीतील निर्भया आरोपींना फाशीला होणारा उशीर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे चिंतातूर झालेल्या अण्णा हजारे आजपासून(20 डिसेंबर) राळेगणसिद्धी येथे मौन धारण करणार आहेत. अण्णांनी गेल्या 9 डिसेंबरला पंतप्रधान मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना पत्र पाठवून निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे अण्णांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण राळेगणसिद्धी या आपल्या गावी  मौनव्रत धारण करणार असल्याचे जाहीर केले होते.

प्रसिद्धपत्रकात अण्णांनी म्हटलं की, दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.

दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहीत करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदींवर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 09:10 AM IST

ताज्या बातम्या