सहकारी बँक घोटाळा : शरद पवारांबाबत अण्णा हजारेंनी केला मोठा खुलासा!

'मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव कुठेही नाही. EDने कारवाई का केली ते आता काही दिवसांनी पुढे येईल.'

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 04:18 PM IST

सहकारी बँक घोटाळा : शरद पवारांबाबत अण्णा हजारेंनी केला मोठा खुलासा!

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 26 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक प्रकरणी EDने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट EDच्या कार्यालयात हजर होणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात EDनं ही कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. याविषयी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली होती आणि प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. अण्णांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली होती. या प्रकरणात शरद पवारा यांचं नाव आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता खुद्द अण्णा हजारे यांनीच या प्रकरणी एक मोठा खुलासा केलाय. अण्णा म्हणाले,  मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव कुठेही नाही. EDने कारवाई का केली ते आता काही दिवसांनी पुढे येईल.

वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणांसह 5 ठार

मात्र संगनमत करून शिखर सहकारी बँकेमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झालाय असा दावाही त्यांनी केला. यामध्ये बँकांप्रमाणेच सहकारी कारखान्यांचा देखील घोटाळा आहे. सहकारी बँक आणि साखर कारखान्यांचा घोटाळा सारखाच आहे. यासाठी मी अनेक पुरावे दिले आहेत. आता EDने कारवाई केली ही समाधानाची बाब आहे असंही ते म्हणाले. दोन्ही प्रकरणं सारखीच असल्याने एकत्र चालवीत अशी विनंतीही अण्णा हजारे यांनी केलीय.

या प्रकरणाचे पुरावे देऊनही CIDचे  डीआयजी जय जाधव यांनी अहवालात तथ्य नसल्याचं म्हटलं होतं त्यांना देखील दोषी धरावं अशीही मागणी अण्णांनी केलीय. या आधी शरद पवार यांनीही आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला होता.

छगन भुजबळांनी जागा वाटपाबाबत भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसला दिला 'हा' सल्ला

Loading...

पवारच जाणार EDच्या ऑफिसमध्ये

'मी स्वत:हून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना माहिती द्यायला तयार आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. 'मी आयुष्यात कधी सहकारी बँकेत कधी संचालक नाही, ईडीने काय तपस करायचा तो करावा,' असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मला 1980 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत अटक झाली. त्यानंतर आता कारवाईची ही दुसरी घटना आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. एक महिना निवडणूक प्रचारसाठी मी महाराष्ट्रभर जाणार आहे. त्यामुळे या काळात मी मुंबई बाहेर असेल. जर ईडीला मला संदेश पाठवायचा असेल तर मी 27 सप्टेंबर ला स्वतः जाईल आणि ईडीचा काही पाहुणचार असेल तो देखील घेईल,' असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...