...आणि भीषण अपघातात अ‍ॅम्बुलन्सचा झाला चुराडा, दोघांचा जागीच मृत्यू

...आणि भीषण अपघातात अ‍ॅम्बुलन्सचा झाला चुराडा, दोघांचा जागीच मृत्यू

ही धडक इतक्या जोरात होती की ट्रकला अ‍ॅम्बुलन्स धडकल्यानंतर बाजूच्या डिव्हायडरवर जावून धडकली आणि गाडीचा चुराडा झाला.

  • Share this:

सांगली 10 मे: सांगली इस्लामपूर रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे अ‍ॅम्बुलन्स आणि गुजरातला पोत्याचे बारदाने घेऊन जाणाऱ्या ट्रकचा सामोरा समोर अपघात झाला. हा अपघात डिग्रज जवळ मातोश्री महीला उद्योग गारमेंट समोर झाला. या अपघातात अ‍ॅम्बुलन्स मधील दोन जण जागीच ठार झाले आहेत.

सांगली-इस्लामपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाबाजूचा जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.  सांगलीहून इस्लामपूरकडे एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे इस्लामपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला रुग्णवाहिकेने समोरून जोरात धडक दिली.

ही धडक इतक्या जोरात होती की रूग्णवाहिका धडकल्यानंतर बाजूच्या डिव्हायडरवर जावून धडकली. यामध्ये अ‍ॅम्बुलन्सचा चालक सनी राठोड आणि अरुण कांबळे हे दोघे जागीच ठार झाले आहेत. या

घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास करत आहेत.

हे वाचा - 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल

पुण्यातलं कोरोनाचं थैमान थांबेना, हे आहे मुंबई आणि राज्यातलं 24 तासांमधलं अपडेट

पुण्यात 69 भागात लागू होणार 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन, ही आहेत शहरं

 

 

 

Tags: accident
First Published: May 10, 2020 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading