महापूरात नष्ट झालेल्या पिकासाठीचं सर्व कर्ज माफ होणार!

या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:30 PM IST

महापूरात नष्ट झालेल्या पिकासाठीचं सर्व कर्ज माफ होणार!

मुंबई 26 ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे  जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या निर्णयात सरकारनं सुधारणा केलीय. पूर्वीच्या आदेशात खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख होता. आता त्याऐवजी या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.

आधीच्या आदेशात त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आलं होतं. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार असल्याची माहितही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी, बंडखोरावर भाजपचा डोळा?

ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.  तसेच गाळाने भरलेली शेते,  खरडलेली माती, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागात आणखी चार महिने मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

पूरग्रस्त भागातील बारा बलुतेदार, शेत मजुर यांना मदत देण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. शेतमजुरांची पडलेली घरे बांधण्यासाठी मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शेतमजुरांच्या रोजगारासंबंधी उपाय योजना काय करता येईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामध्ये वाढ करता येईल का याचाही विचार होणार आहे.

Loading...

बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

व्यापाऱ्याच्या एक लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा काही भाग शासनाने भरणे, पुनर्गठन करणे किंवा कर्ज भरण्याची मुदत एक वर्षाने पुढे ढकलणे आदी निर्णयांबरोबरच या छोट्या व्यापाऱ्यांना लागू होणारी नुकसान भरपाई ग्रीन हाऊस, गुऱ्हाळांना लागू करता येईल का यावर सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पाटील म्हणाले, पूरग्रस्त भागातील पाणी ओसरले आहे. गावातील स्वच्छता करण्यासाठी शासनासह नागरिक, स्वयंसेवी संस्था काम करत आहे. घर चालविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाच हजार रुपये रोख अनुदान देण्यात आलंय. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरातील सुमारे 25 हजार गॅस शेगड्या दुरुस्त करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2019 09:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...