शिवसेनेची चिंता वाढली; अजित पवार म्हणतात, सत्तावाटपाचं काहीच ठरलेलं नाही

शिवसेनेची चिंता वाढली; अजित पवार म्हणतात, सत्तावाटपाचं काहीच ठरलेलं नाही

'जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल.'

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती 17 नोव्हेंबर : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेने NDAमधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरूच असून त्यातून अजुनतरी काहीही ठोस निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळेही आता शिवसेनेच्या चिंतेत वाढ झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये असंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.

 देवेंद्र फडणवीसांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट

काही फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील.

राष्ट्रवादीत 'ते' उमेदवारही झाले आमदार, अजित पवारांनी सांगितला गंमतीशीर किस्सा

भाजपनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न. आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करतायत.  जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल.

Tags:
First Published: Nov 17, 2019 05:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading