मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोहितला निवडून देण्यासाठी बारामतीकरांनी केलं जीवाचं रान - अजित पवार

रोहितला निवडून देण्यासाठी बारामतीकरांनी केलं जीवाचं रान - अजित पवार

सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बारामती 10 जानेवारी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य सत्कार आज बारामतीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामतीत आले होते. ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अजित पवार शहरात आल्यानंतर मुख्यरस्त्यावरून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. भव्य हार, तुरे, फुलं यांची बरसात अजित पवारांवर करण्यात आली. क्रेनच्या साह्याने प्रचंड मोठे हार अजित पवारांना घालण्यात आले. काही तास चाललेली ही मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी सभा झाली या सभेत अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले. आणि बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून देण्यासाठी जीवाचं रान केलं असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता लोकांच्या कामासाठी झटा असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार म्हणाले, बारामतीकरांनी मला लाखाच्या वर मतांनी निवडून दिलं. त्याची सर्व देशात दखल घेतली गेली. आईने तान्हुलीला रस्त्यावर टाकलं, मात्र वर्दीतल्या मातेनं ह्रदयाशी कवटाळलं बारामतीकरांनी इतर जागा निवडून आणण्यासाठीही प्रचंड संघर्ष केला. कर्जत-जामखेडमध्येही रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या कष्टाचा उतराई मी कधीच होऊ शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

VIDEO: दानवे-महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा, शाई फेकत केली घोषणाबाजी

सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बारामतीच्या विकासासाठी यापुढेही काम करणार असल्याचं ते म्हणाले. पण या सत्कार सोहळ्याला आमदार  रोहित पवार आणि सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलाय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ajit pawar, Rohit pawar

पुढील बातम्या