Home /News /maharashtra /

अजित दादा 'स्टेपनी', या वादानंतर उद्धव ठाकरेंचं बारामतीत मोठं वक्तव्य

अजित दादा 'स्टेपनी', या वादानंतर उद्धव ठाकरेंचं बारामतीत मोठं वक्तव्य

'सुप्रियाने विचारलं तुमचं घड्याळाचे दुकान आहे का? मी म्हटलं नाही. घड्याळ वाले माझे पार्टनर आहेत.'

बारामती 17 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना 'स्टेपनी' म्हटल्याबद्दल नवा वाद निर्माण झालाय. राष्ट्रवादीने उघडपणे नाही तर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे समर्थकही आक्रमक असल्याचं बोललं जातं. हा वाद ताजा असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीत होते. निमित्त होतं बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी काही काळ उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एकाच गाडीत बसले. त्यावेळी त्यांनी अजित पवारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं. बारामतीतील शारदानगर येथील 110 एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आज पासून सुरू झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , कृषी मंत्री दादासाहेब भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रीया सुळे व सिने अभिनेता अमीर खान उपस्थित होते. प्रदर्शन पाहण्यासाठी जाताना अजित पवार हे गाडी चालवत होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळ गाडीत बसले. त्यावेळी गाडीत बसताना ठाकरे म्हणाले, आमच्या गाडीचं चाक अजित दादांकडेच आहेत. यावेळी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते मात्र ते काहीच बोलले नाहीत. काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी इथे पाहायला ऐकायला आलो आहे. पण मुख्यमंत्री आहे म्हणून कळो न कळो बोलावं लागतं. तंत्रज्ञान वगैरे शब्द वापरले की लोकांना वाटतं मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. आता व्हर्टिकल गार्डन सोबत व्हर्टिकल शेती आलीय. महाराष्ट्राच्या भूमी चमत्कार जन्माला येतो. चंद्रपूरच्या शेतकऱ्याने तांदळाची जात, वाण आणलं त्याला घड्याळाचं नाव दिलं HMT. मला सुप्रियाने विचारलं तुमचं घड्याळाचे दुकान आहे का?

काँग्रेसने डोळे वटारताच राऊतांनी मागे घेतलं इंदिरा गांधींबद्दलचं 'ते' वक्तव्य

मी म्हटलं नाही. घड्याळ वाले माझे पार्टनर आहेत. वेळ यावी लागते. योग्य वेळी सत्ता आली आहे. यामुळं आता सुजलाम सुफलाम करून दाखवू. मी सुद्धा बारामतीला येत जात राहणार आहे. सगळे बरोबर आहेत. अजित दादाही आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ajit pawar, Uddhav thackeray

पुढील बातम्या