अजितदादा अजूनही शांत नाहीत, भाजपा नेत्याचे सूचक विधान 

अजितदादा अजूनही शांत नाहीत, भाजपा नेत्याचे सूचक विधान 

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांना स्थान मिळणार असून त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

कोल्हापूर 24 डिसेंबर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपाकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परत जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलंय. अजुन मंत्रिमंडळाचा विस्तारही झालेला नाही त्यामुळे माधव भांडारी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. पण राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी त्यांचं मन वळवत त्यांना पुन्हा पक्षात आणलंय.

त्या फसलेल्या बंडानंतरही अजित पवारांना राष्ट्रवादीत मानाचं स्थान मिळालंय. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला नव्हता.

अजित पवारांना लगेच मंत्रिमंडळात घेतलं असतं तर त्याचा योग्य संदेश गेला नसता असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. तर अजित पवारांनीही लगेच मंत्रिमंडळात जाणार नाही असं सांगितल्याचंही पवारांनी सांगितलं होतं.

अजित पवारांच्या विश्वासावर आम्ही सरकार स्थापन केलं मात्र आमचा तो प्रयोग फसला होता असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. काँग्रेस आणि शिवसेनेसोबतचं सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे भाजपसोबत जावून स्थिर सरकार दिलं पाहिजे असं अजित पवारांचं मत होतं अशीही चर्चा होती.

धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट? ही आहे संभाव्य मंत्र्यांची यादी

मात्र मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांना स्थान मिळणार असून त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना अजित पवारांचा आधार वाटतो. सगळ्यांसाठी ते मदतीला धावतात त्यामुळे त्याबद्दल एक वेगळ्या भावना आहेत असंही शरद पवारांनी सांगितलं होतं.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 24, 2019, 9:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading