गुरूजींची आयडीया भारी...नगरच्या झेडपीची रेल्वे शाळाच न्यारी!

गुरूजींची आयडीया भारी...नगरच्या झेडपीची रेल्वे शाळाच न्यारी!

'शाळेची सुट्टी झाल्यानंतरही मुलं वर्गाच्या बाहेरच निघायचं नाव घेत नाही. मुलांना एवढी आवडली ही शाळा.'

  • Share this:

हरीष दिमोटे, अहमदनगर 02 डिसेंबर :अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेची शाळा चक्क धावत्या रेल्वेत भरतेय. रेल्वे आणि शाळा म्हटल्यानंतर नक्कीच सगळ्यांना आश्चर्य वाटेल. मात्र ही रेल्वे आणि त्यात भरणारी शाळा अतिशय अभिनव असून या शाळेने मुलांना वेड लावलंय. तर या अनोख्या शाळेचं सगळ्याचं स्तरातून कौतुक होत असून त्यामुळे शाळेत मुलांची संख्याही वाढलीय. रामपूरवाडीच्या या एक्सप्रेस शाळेचं नावं आता सगळीकडेच पोहोचलं असून मुलं सकाळी स्कूल चले हम असं म्हणत शाळेत धाव घेत असतात. काही तरी आगळं वेगळं करण्यासाठी शिक्षक आणी व्यवस्थापन कमेटीने विचार केला. अनेक कल्पनांचा विचार केल्यानंतर त्यांना सूचली ही रेल्वेची शाळा. पण खरोखरच्या रेल्वेत शाळा भरवणं हे काही प्रत्यक्षात व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे मग रेल्वेचीच प्रतिकृती उभारण्याचा विचार शिक्षक आणि गावकऱ्यांनी केला आणि एक अनोखी शाळा साकारली गेली.

या शाळेत असलेल्या सर्व खोल्या आणि बाहेरच्या परिसराला रेल्वेसारखा रंग आणि सजावट करण्याचा सगळ्यांनी निश्चय केला आणि पाहता पाहता हुहेबहुब रेल्वेचा रंग शाळेला दिला गेला. खिडक्या, दरवाजे, बाहेरचे खांब सगळं काही रेल्वेसारखं. त्यामुळे बाहेरून पाहिलं तर ही रेल्वेच आहे असा भास होतो.

या सजावटीचा परिणाम म्हणजे मुलांची संख्या वाढली. शिक्षक आणि मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही वाढला. मुलं एवढी उत्साही आहेत की शाळा सुटल्यानंतरही ती शाळेतच खेळत असतात आणि सुट्याही घेत नाहीत अशी प्रतिक्रिया इथल्या शिक्षकांनी व्यक्त केलीय.

ही सर्व शाळा डिजिटल असून प्रत्येक वर्गखोलीत एलईडी टीव्ही बसविण्यात आलाय. त्यामुळे शिक्षणाचाही दर्जा उंचावला असून या प्रयोगाची सर्वत्र दखल घेतली जातेय. मुलं जेव्हा खिडकीत उभं राहून टाटा करतात तेव्हा तर मुलं रेल्वेतच उभी आहेत असं दिसतं.

महाराष्ट्रातील एका दशकापुर्वीची सगळी पिढी  याच जिल्हा परिषद शाळेतून घडलीय मात्र गेल्या दहा वर्षात इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत कुठंतरी मागं पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळांनीही आता कात टाकलीय. अशा प्रकारच्या नवनविन उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळाही कुठं कमी नाही हेच दिसून येतंय.

हेही वाचा...

'या' कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे

'पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला'

चिंतन करताहेत पंकजा मुंडे.. मामा म्हणाले, 'तो' विचार त्या कधीही करू शकत नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading