अहमदनगरमध्ये 'विखे पॅटर्न' दिसलाच नाही, महाविकास आघाडीच्या ताकदीपुढे भाजपची माघार

अहमदनगरमध्ये 'विखे पॅटर्न' दिसलाच नाही, महाविकास आघाडीच्या ताकदीपुढे भाजपची माघार

अहमदनगरमधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, 31 डिसेंबर, अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी अहमदनगरमधील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसली आहे. अहमदनगर जिल्हापरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळके यांची निवड झाली आहे. या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर प्रथमच अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद गेलं आहे. भाजपकडे या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र तरीही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आणि नगरच्या राजकारणात वर्चस्व असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 'विखे पॅटर्न'च्या जोरावर भाजप निवडणूक जिंकेल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र भाजपने या निवडणुकीत माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, आमदार बिघडवू शकतो गणित

अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजश्री घुले तर काँग्रेसकडून प्रताप शेळके मैदानात उतरले होते. तर भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर आणि उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांनी घेतला. त्यामुळे घुले आणि शेळके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

विखेंच्या पत्नी म्हणतात...मी काँग्रेसमध्येच!

जिल्हापरिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली. भाजपचे गणित जुळत नसल्याने त्यांनी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणूक सभेत भाजपच्या सदस्यांची अनुपस्थिती होती. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांनी मी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. सभेला 67 सदस्य उपस्थित आहेत. आघाडी झाल्यामुळे जिल्हापरिषदेला चांगला निधी मिळेल, असा विश्वास नवीन अध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू असताना शरद पवारांचं धक्कातंत्र, पक्षात नाराजी?  

शालिनी विखे या सलग पाच वर्षे अध्यक्ष आहेत. या निवडणुकीत त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता, तसेच त्या काँग्रेसमध्येच असल्याचे त्या सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीने राजश्री घुले आणि शेळके यांना उमेदवारी दिली होती. भाजपने दोघांचे अर्ज दाखल केले होते, मात्र दोघांनीही अर्ज माघारी घेतले. जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली त्यांनी सर्वांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या