Home /News /maharashtra /

आम्ही जगायचं कसं? आम्हालाही सूट द्या, सांगलीत 300 फास्टफूड विक्रेत्यांचं आंदोलन

आम्ही जगायचं कसं? आम्हालाही सूट द्या, सांगलीत 300 फास्टफूड विक्रेत्यांचं आंदोलन

सांगली शहरात सुमारे 500 पेक्षा जास्त हात गाडी विक्रेते आहे. त्यांना आता पोट भरण्यासाठी आपला व्यवसाय सुरू करायचा आहे.

सांगली 8 जून:  हातगाडी आणि फास्टफूड विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी सांगलीतील हातगाडी विक्रेत्यांनी केली. हे आंदोलन त्यांनी अनोख्या पद्धतीने केले. रस्त्याच्याकडेला उभे राहून हातात फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. यामध्ये आता हॉटेल व्यवसायिकांना पार्सल विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र हातगाडी, फास्टफूड विक्रेत्यांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. हातावर पोट असणारे हात गाडी विक्रेते तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अडचणीत आहेत. त्यामुळे हातगाडयांवरील विक्री व्यवसाय चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातगाडी विक्रेत्यांनी सांगलीमध्ये अनोखे आंदोलन केलं. रस्त्याच्या कडेला उभे राहून हातात फलक घेऊन आम्हालाही पार्सल विक्रीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सोशल डिस्टन्सिंग पाळत हे अनोखी मागणी करण्यात आलं. जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल सांगली- मिरज रोडवरील विश्रामबाग पासून मार्केट यार्ड, तसेच शहरातील स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर याठिकाणी हातगाडी विक्रेत्यांनी डोक्यावर टोपी व हातात फलक घेऊन हे आंदोलन केले, ज्यामध्ये 300पेक्षा जास्त हातगाडे विक्रते सहभागी झाले होते. सांगली शहरात सुमारे 500 पेक्षा जास्त हात गाडी विक्रेते आहे. हे वाचा -  जम्मू आणि काश्मीर: 6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा चक्रीवादळाने झोडपल्यानंतर 5 दिवसानंतर आली सरकारला जाग, घेतला हा निर्णय संपादन - अजय कौटिकवार
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या