शरद पवारानंतर भाजप रोहित पवारांनाही धक्का देणार!

राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असून त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण चांगलच तापणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 09:20 PM IST

शरद पवारानंतर भाजप रोहित पवारांनाही धक्का देणार!

साहेबराव कोकणे, अहमदनगर 15 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पक्षात घेऊन भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार धक्का दिलाय. हे धक्का बसत असताना पवार घराण्यातल्या तीसऱ्या पिढीचे वारसदार रोहित पवार यांनाही भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहेत. रोहित पवार हे विधानसभेसाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. रोहित हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून शरद पवारांचे लाडके नातू आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी कर्जत आणि परिसरात विविध उपक्रम राबवून जोरदार तयारी केलीय. इथं रोहित पवारांना धक्का देण्याची योजना भाजपने तयार केलीय. कर्जत जामखेड हा मतदारसंघ भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड भाजपाच्या वाटेवर आहेत. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जातंय. हा रोहित पवारांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. तर राम शिंदे यांना दिलासा मिळालाय.

भाजपच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमामधून गणेश नाईकांचा काढता पाय

अहमदनगर कर्जत जामखेड मतदार संघात बारामतीकरांनी लक्ष असल्यामुळे हा मतदारसंघ सध्या चर्चेत आलाय अहमदनगर चे पालकमंत्री राम शिंदे हे गेली दहा वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे पुतणे हे या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत रोहित पवार हे निवडणूक लढत असल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते मात्र नाराज आहेत असं बोललं जातंय.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे.

युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?

Loading...

दोन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळेस त्यांना राष्ट्रवादी कडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण चांगलच तापणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...