बापरे! पुण्यानंतर आता ‘या’ शहरातही 10 दिवसांच्या Lockdownची घोषणा

बापरे! पुण्यानंतर आता ‘या’ शहरातही 10 दिवसांच्या Lockdownची घोषणा

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या काळात फक्त मेडिकल आणि इतर काही दुकानेच सुरू राहणार आहेत.

  • Share this:

सोलापूर 11 जुलै: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुण्यापाठोपाठ (Pune) सोलापूर शहरातही लॉकडाऊनची (Solapur Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. 16 ते 26 जुलै असे 10 दिवस हा लॉकडाऊन असेल अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. राज्यात आणि देशात अडीच महिने लॉकडाऊन होता. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर गर्दी वाढली. त्यामुळे रुग्णांची संख्याही (Corona Patient) वाढली आहे. सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 3075 रुग्ण निघाले आहेत.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या काळात फक्त मेडिकल आणि इतर काही दुकानेच सुरू राहणार आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे.  आज राज्यात विक्रमी 8139 रुग्ण सापडले आहेत.  तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत 10 हजार 116 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 2 लाख 46 हजार 600 एवढा झाला आहे. तर Active रुग्णांची संख्या 99 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईत आज 1284 नवे रुग्ण  सापडले.  त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 91745 वर गेली आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईतल्या एकूण मृत्यूची संख्या 5244 तर मुंबईतल्या Active रुग्णांची संख्या 22782वर गेली आहे. आज 4360 एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. तर रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे.

हे वाचा -  महाराष्ट्र हादरला, मृतांचा आकडा 10 हजारांवर तर 24 तासांत विक्रमी 8139 नवे रुग्ण

पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पुणेकर नाराज झाले आहे. तसेच या निर्णयाला व्यापारी संघानेही कडाडून विरोध केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा...राज्यात सत्तेच्या वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत इथे मात्र मतभेद!

पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नसून तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या माहिती व सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतलेला आहे, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 11, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या