नशेच्या आहारी गेला होता मुलगा.. कुऱ्हाड डोक्यात घालून बापाची केली हत्या

नशेच्या आहारी गेला होता मुलगा.. कुऱ्हाड डोक्यात घालून बापाची केली हत्या

नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या बापालाच संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. दारु प्यायला पैसे न दिल्याने मुलाने बापावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात बापाचा जागेवरच मृत्यू झाला.

  • Share this:

सागर सुरवसे (प्रतिनिधी)

सोलापूर, 13 ऑगस्ट- नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या बापालाच संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. दारु प्यायला पैसे न दिल्याने मुलाने बापावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात बापाचा जागेवरच मृत्यू झाला. रामचंद्र बनसोडे असे या मृत वडिलाचे नाव आहे.

अक्कलकोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मल्लिनाथ बनसोडे हा बेरोजगार असून पूर्णतः नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे सातत्याने घरात पैशाची मागणी करत होता. घरात कमविणारे कोणीही नसल्याने वडीलाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर चिडलेल्या मल्लिनाथने सुरूवातीला आपल्या वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करूनही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने घरातील कुऱ्हाडीने वडिलावर वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मल्लिनाथ याला अटक केली आहे.

मुलगा माझा नाही दुसऱ्याचा.. जन्मदात्यानेच तान्हुल्याच्या डोक्यात घातला वरवंटा

मुलगा माझा नाही, दुसऱ्याचा... या संशयातून जन्मदात्याने 8 महिन्यांच्या तान्हुल्याचा अनन्वित छळ करून जीव घेतल्याची संतापजनक घटना लातुर येथे घडली आहे. निर्दयी बापाने आपल्या मुलाला ठार मारण्याआधी गरम ग्लासाचे चटके दिले होते. त्याच्या डोळ्यात तिखट टाकले होते. लोखंडी उलथन्याने मारहाण केली होती. शेवटी दगडी वरवंटा डोक्यात घालून चिमुरड्याची क्रूरपणे हत्या केली. स्वप्नील असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. शनिवारी (10 ऑगस्ट) रात्री ही घटना लातूर शहरातील संजयनगरात घडली. पोलिसांनी रविवारी आरोपी बाप सोमनाथ शिवाजी साळुंके याला अटक केली आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय..

सोमनाथ साळुंके आणि माधुरी साळुंके या दाम्पत्याला विवाहानंतर पहिला मुलगा झाला. पण सोमनाथ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातच या दाम्पत्याला दुसऱ्यांदाही मुलगा झाला. मात्र, हा मुलगा माझा नाही, असा संशय सोमनाथ होता. या संशयावरून त्याने माधुरीचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला होता. एवढेच नाही तर आठ महिन्यांच्या स्वप्नीलला पाण्यात पाहात होता. तो त्याचा सारखा तिरस्कार करत होता. तान्हुल्याला चहाच्या गरम ग्लासाचे चटके देणे, डोळ्यात तिखट टाकणे असा छळ करत होता. शनिवारी रात्री सोमनाथने स्वप्नीलला लोखंडी उलथने बेदम मारहाण केली. शेवटी त्याने दगडी वरवंटाच त्याच्या डोक्यात घातला. तान्हुल्या स्वप्नीलने जागेवरच जीव सोडला. माधुरी साळुंके ( वय-24, रा. संजयनगर, लातूर) हिने दिलेल्या तक्रारीवरून नराधन बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

First Published: Aug 13, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading