…आणि एका क्षणात भरधाव कार 400 फुट दरीत कोसळली, महाबळेश्वर पाहण्याचं स्वप्न अधुरं VIDEO

…आणि एका क्षणात भरधाव कार 400 फुट दरीत कोसळली, महाबळेश्वर पाहण्याचं स्वप्न अधुरं VIDEO

या गाडीतील दोन जणांना जखमी अवस्थेत दरीमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

  • Share this:

सातारा 24 ऑक्टोबर: कोरोनाची साथ आणि लॉकडाउनमुळे सगळ्यांना गेली 6 महिने घरात कोंडून राहावं लागलं. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे लोक बाहेर पडू लागले आहेत. याच भावनेने मुंबईचे काही पर्यटक महाबळेश्वरला निघाले होते. मात्र त्यांच्या गाडीला साताऱ्याजवळ अपघात झाला आणि महाबळेश्वर पाहण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन दोन जण जखमी झाले आहेत.

साताऱ्यातल्या पाचगणी जवळच्या पसरणी घाटात हा अपघात झाला. पाचगणीहून ही मंडळी आपल्या स्विफ्ट कारने महाबळेश्वरकडे निघाली होती. वाईकडे जात असतानाच ड्रायव्हरचा कारवरचा ताबा सुटला आणि काही क्षणात गाडी घाटात 400 फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन  महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

या गाडीतील दोन जणांना जखमी अवस्थेत दरीमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमीं हे मुंबई येथील रहिवाशी आहेत अशी माहिती आहे.

घटनास्थळी पोलिसही हजर झाले असून त्यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला. हा भाग हा घाट आणि अवघड वळणांचा आहे. खोल दऱ्याही आहेत. त्यामुळे अपघात झाला की बचाव कार्य करणं हे अत्यंत अवघड काम आहे. मात्र महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम ही स्वयंसेवी संस्था अतिशय आस्थेने गेली अनेक वर्ष अशा अपघात काळात मदतीसाठी तत्पर असते आणि बचाव कार्य करत असते. याही आपघातात याच संस्थेने केलेल्या मदतीमुळे दोन जणांचे प्राण वाचले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या