Home /News /maharashtra /

औरंगाबाद निवडणुकीत मोठं नाट्य, समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवडला अध्यक्ष

औरंगाबाद निवडणुकीत मोठं नाट्य, समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवडला अध्यक्ष

अब्दुल सत्तार यांचा निरोप शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारापर्यंत पोहोचलाच नाही.

  सचिन जिरे, औरंगाबाद, 4 जानेवारी : औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अब्दुल सत्तार यांची समजूत काढल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र अब्दुल सत्तार यांचा निरोप शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारापर्यंत पोहोचलाच नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदअध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाताई शेळके यांचा विजय झाला आहे तर उपाध्यक्षपदी भाजप चे एल.जी.गायकवाड विजयी झाले आहेत. या निवडणुकीत माजी अध्यक्षा देवयानी डोनगवकर यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान 30-30 मते पडली होती. त्यानंतर इश्वर चिठ्ठीत शेळके यांचा विजय झाला आहे. शिवसेनेला खुली ऑफर, मंत्र्याने राजीनामा देताच भाजप खासदाराने केलं खळबळनक वक्तव्य दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेते अर्जुत खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत तसं घडलंच नाही आणि ही निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. दरम्यान, शुक्रवारीदेखील औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Congress

  पुढील बातम्या