धरीला पंढरीचा चोर... विठ्ठल मंदिरात चोरानं टाकला दानपेटीतच हात!

'लालच बुरी बला है' म्हणतात ना त्यामुळे विठ्ठलाच्या दरबारातील हा चोर अलगद जाळ्यात अडकला.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 03:47 PM IST

धरीला पंढरीचा चोर... विठ्ठल मंदिरात चोरानं टाकला दानपेटीतच हात!

विरेंद्र उत्पात पंढरपूर 3 सप्टेंबर : श्रावण आणि सणांच्या महिन्यांमुळे सध्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चांगलीच गर्दी आहे. या गर्दीत जसे भक्त असतात तसेच चोरही असतात. अशाच एका चोराला आज रंगेहात पकडण्यात आलं आणि त्याचं बिंग फुटलं. गर्दीमुळे दानपेटीत दक्षिणा जास्त प्रमाणात येत असते. त्यामुळे दानपेट्या लवकरच भरून जातात. अशा भरलेल्या दानपेटीत दान टाकण्याचं नाटक करत हा चोर हात घालून पैसे चोरून घेत असल्याचं उघड झालंय. काल दुपारी तीन वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्यंकटेश मंदिरात संतोष नाना मोरे यांनी तब्बल सहा वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याचे पोलिस कॉन्स्टेबल वामन यलमार यांच्या लक्षात आलं. पोलीस यलमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता तब्बल सहा वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याचं त्यांना आढळून आलं.

मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही शस्त्राची तस्करी, पोलिसांनी कसली कंबर

दक्षिणा पेटी  भरल्याने पैसे वर आले होते. एकदा चोरट्याला यश आल्यावर त्याने वारंवार हा प्रयोग केला.  पैसे चोरता येतात हे कळाल्याने चोराला मोह आवरला नाही व चोरटा परत एकदा चोरी करायला आल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल वामन यलमार यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

'लालच बुरी बला है' म्हणतात ना त्यामुळे विठ्ठलाच्या दरबारातील हा चोर अलगद जाळ्यात अडकला. पोलीस कॉन्स्टेबल वामन यलमार  यांनी आषाढी यात्रेदरम्यान मंदिर समितीचा कर्मचारी सिध्देश्वर घायाळ पावती घोटाळा उघडकीस आणला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा देणगी पेटीतील पैसे चोर पकडल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

घरकुल घोटाळा : माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह 38 आरोपींची तुरुंगात रवानगी

Loading...

CCTV आणि ड्रोन कॅमेरा ठेवणार चोरांवर नजर

मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन हा मराठवाड्यातील पहीला प्रयोग बीड मध्ये राबवला जातोय. या व्हॅनच्या माध्यमातून डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी  महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे. गणपती उत्सव, मोहरम आणि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर  बीड मधील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि नवीन तंत्रज्ञनाचा वापर केला जात आहे.

हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान

या व्हॅनमध्ये ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 1353 परवानगी धारक गणेश मंडळाना प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी दत्तक देण्यात आलाय. तसेच बंदोबस्तासाठी 27 वरिष्ठ पोलीस निरिक्षक, 84 स.पोलीस निरिक्षक, 1200 कर्मचारी, 1100 होमगार्ड एसआरपीएफ कंपनी, असा तगडा बंदोबस्त असणारं आहे. तसेच समाजिक विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना गणराय अवार्ड देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...