Home /News /maharashtra /

शाब्बास! नगरच्या इंजिनिअर तरुणाने बनवलं टाकावू वस्तुंपासून JIVA व्हेंटिलेटर

शाब्बास! नगरच्या इंजिनिअर तरुणाने बनवलं टाकावू वस्तुंपासून JIVA व्हेंटिलेटर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीव वाचविणारे शूर सरदार जिवा महाले यांचं नाव व्हेंटिलेटरला दिलं आहे.

अहमदनगर 29 एप्रिल: भारतासह सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. अशा प्रसंगी सर्वच आरोग्य सेवाही कमी पडत आहेत.  या आजारात प्रामुख्याने  व्हेंटिलेटरची जास्त गरज पडते. फक्त व्हेंटिलेटर नसल्याने कोरोनामुळे जगभर शेकडो लोकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं आहे. ग्रामीण भागात तर सुविधांची आणखी कमतरता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या जामखेड मधल्या सोहेल इब्राहिम सय्यद या युवकाने टाकावू वस्तुंपासून व्हेंटिलेटर तयार केलं असून डॉक्टरांच्या चाचणीत ते यशस्वी ठरलं तर ग्रामीण भागासाठी ते वरदान ठरणार आहे. सोहेलने त्या व्हेंटिलेटरला JIVA ( जीवन आणि वायु प्रदान करणारा ) हे नाव दिले आहे. कोरोनामुळे सोहेल सध्या घरीच आहे. या रिकाम्या वेळेत त्याने काही प्रयोग केलेत आणि घरातल्या टाकावू वस्तुंपासून एक व्हेंटिलेटर तयार केलं हे Automatic Continuous positive airway pressure (CPAP) Ventilator Prototype असून यात 90 टक्के वस्तू या टाकावू म्हणून ज्या अडगळीत टाकण्यात आल्या होत्या त्याचा वापर करण्यात आल्याचं त्याने सांगितलं. यात काही Electronic Componentsची गरज आहे. लॉकाडाऊनमुळे ते मिळत नाहीत. ते मिळाले तर हे व्हिंटिलेटर आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल असंही त्याने सांगितलं. पुण्यात महिलेच्या मृत्यूनंतर घडली भयंकर चूक आणि अख्खा कुटुंबाचा जीव आला धोक्यात हा प्रयोग यशस्वी ठरला तर कोरोना संकटामध्ये अचानक जर व्हेंटिलेटर्सची गरज भासल्यास हा कमी खर्चात शासनाला उपलब्ध होऊ शकतो. कमी खर्चात आणि कमी वेळात हे व्हेंटिलेटर्स मोठ्याप्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. यासाठी शासनच्या वैद्यकीय विभागाने यांची दखल घेणे गरजेचे आहे असं मतही त्याने व्यक्त केलं. तो हे व्हेंटिलेटर नगरच्या सरकारी हॉस्पिटलला देणार आहे. सोहेल सय्यद हा विद्युत अभयांत्रिकीचा विद्यार्थी असून शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील नामांकित MNC मध्ये काम करून त्याने स्वतःचा व्यवसायही उभारला आहे. कोरोना योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लढला; लेक करणारं त्यांचं अधूरं स्वप्न पूर्ण व्हेंटिलेटरला JIVA हे नाव  महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीव वाचविणारे शूर सरदार जिवा महाले यांच्या नावाने प्रेरीत होऊन दिलं असंही सोहेल सय्यद याने सांगितले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या