कोल्हापूर जिल्ह्यात 69 जिवंत गावठी बॉम्ब जप्त, 'त्या' स्फोटाशी कनेक्शन?

कोल्हापूर जिल्ह्यात 69 जिवंत गावठी बॉम्ब जप्त, 'त्या' स्फोटाशी कनेक्शन?

सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे असे साहित्य वापरल्याची तसेच त्याच्यावर रक्तिचे आवरण...

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर,23 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथे 69 गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे. विलास जाधव आणि आनंदा जाधव अशी अटक केलेल्यांची नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळलेली माहिती अशी की, आरोपी विलास जाधव आणि आनंदा जाधव या दोघा संशयितयांच्या घरातून 69 गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य,असा सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये उजळाईवाडीमध्ये झालेल्या स्फोटाचे धागेदोरे आहेत का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी शाहू टोलनाक्याजवळ उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (वय-56 रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख व अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकासह, स्थानिक गुन्हे अन्वेषण, बॉम्ब शोधक व नाशक पथक करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हातकणंगले येथील माले मुडशिंगी येथे छापा टाकून विलास जाधव, आनंदा जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरातून सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे यासह 69 जिवंत गावठी बॉम्ब जप्त केले. विलास आणि आनंदा यांनी या पूर्वी अशा प्रकारचे बॉम्ब तयार केले आहेत काय, त्याची विक्री कोणा कोणास केली याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

रानडुकरांच्या शिकारीसाठी शिकारीसाठी वापर

विलास जाधव आणि आनंदा जाधव यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे बॉम्ब घरामध्ये तयार केले आहेत. यासाठी सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे असे साहित्य वापरल्याची तसेच त्याच्यावर रक्तिचे आवरण लावल्याची कबूली या दोघांनी दिली. तसेच या बॉम्बचा वापर रानडुक्कराची शिकार करण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

VIDEO: EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

First published: October 23, 2019, 9:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading