निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीचा इशारा

निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीचा इशारा

विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दणका बसला आणि काँग्रेस - राष्ट्रवादीवर मतांची बरसात झाली. आता निकाल लागल्यानंतर मात्र याच भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दणका बसला आणि काँग्रेस - राष्ट्रवादीवर मतांची बरसात झाली. आता निकाल लागल्यानंतर मात्र याच भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे 72 तास कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 25, 26 आणि 27 ऑक्टोबर हे तिन्ही दिवस इथे अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या भागांत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पूर आला. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळताच तहसीलदार, प्रांत, तलाठी या अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होईल,असा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.आज दुपारपासूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार आहे.

(हेही वाचा : पाहा PHOTO : महाराष्ट्राच्या महासंग्रामात कोण जिंकलं? कोण हरलं?)

दिवाळी आली तरी अजूनही महाराष्ट्रात पाऊस बरसतोच आहे. पश्चिम महाराष्ट्रातली अनेक गावं महापुरातून सावरतायत. त्यातच परतीच्या मुसळधार पावसाची चिन्हं आहेत.दिवाळीच्या उत्साहावर यामुळे पाणी फेरलं जाऊ नये, असंच सगळ्यांच्या मनात आहे.

=======================================================================================

VIDEO : पंकजा मुंडेंच्या पराभवावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

First published: October 24, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading