Solapur Maharashtra Election Result 2019 Live : सोलापूरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकालाचे LIVE अपडेट

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. आज (24 ऑक्टोबर) मतमोजणी होत असून निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 09:25 AM IST

Solapur Maharashtra Election Result 2019 Live : सोलापूरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकालाचे LIVE अपडेट

सोलापूर, 24 ऑक्टोबर : जिल्ह्य़ात चुरशीच्या लढती असून दिग्गजांचे राजकीय भवितव्य आजच्या निकालातून ठरणार आहे. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्याशिवाय प्रणिती शिंदे, दिलीप सोपल, रश्मी बागल, सुधाकरपंत परिचारक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Live Update :

- सोलापूर शहर उत्तर : पहिल्या फेरीत विजयकुमार देशमुख(भाजपा) 3784 मतांनी आघाडीवर

- मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती आले तेव्हा सोलापूरमधून प्रणिती शिंदे पिछाडीवर आहेत.

एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

Loading...

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...