Maharashtra Election Result 2019 Live : साताऱ्यात कोणाची 'आघाडी' कोणाची पिछेहाट?

Maharashtra Election Result 2019 Live : साताऱ्यात कोणाची 'आघाडी' कोणाची पिछेहाट?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. आज (24 ऑक्टोबर) मतमोजणी होत असून निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

सातारा, 24 ऑक्टोबर : साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने इथले कल येण्यास उशिर होऊ शकतो. लोकसभेनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांचे आव्हान आहे.

LIVE UPDATE

कराड दक्षिण पाचव्या फेरीअखेर पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

कराड उत्तर सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील 888 मतांची आघाडीवर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे सुरुवातीच कल हाती आले तेव्हा उदयनराजे पिछाडीवर होते. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर होते.

एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

Published by: Suraj Yadav
First published: October 24, 2019, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading