Maharashtra Election Result 2019 Live : सांगलीत कोणाची होणार सरशी?

Maharashtra Election Result 2019 Live : सांगलीत कोणाची होणार सरशी?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. आज (24 ऑक्टोबर) मतमोजणी होत असून निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

सांगली, 24 ऑक्टोबर : जिल्ह्यातील 8 मतदार संघात विधानसभेच्या रणांगणात 4 मतदार संघात भाजपा-सेने मध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे दुरंगी आणि तिरंगी लढती पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 8 जागांवर 68 उमेदवार मैदानात उतरले होते. यामध्ये भाजपाला 4 मतदार संघात बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. जत,शिराळा मतदार संघात भाजपाचे तर इस्लामपूर मध्ये सेनेला भाजपच्या बंडखोराचे तर सांगलीत भाजपा सेनेच्या बंडखोराचे आव्हान होते. यामुळे 8 मतदार संघात काही ठिकाणी दुरंगी,तिरंगी लढत झाली.

Live Update :

-शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पहिल्या फेरीत मानसिंगराव नाईक. 2900मतांनी आघाडीवर आहेत

-सांगलीतून आमदार सुमनताई पाटील आघाडीवर आहेत. तर जतमध्ये विक्रम सावंत आघाडीवर आहेत.

एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading