मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शौचालयाअभावी तरुणीच्या अब्रूच्या चिंध्या, देतेय मृत्यूशी लढा

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शौचालयाअभावी तरुणीच्या अब्रूच्या चिंध्या, देतेय मृत्यूशी लढा

राजकीय नेत्यांनी अच्छे दिनचे कितीही स्वप्नं दाखवले तरी मूर्दाड व्यवस्था बदलायला तयार नाही. त्याचे भोग सर्वसामान्यांना भोगावेच लागतात.

  • Share this:

नागपूर, 22 ऑगस्ट : राजकीय नेत्यांनी अच्छे दिनचे कितीही स्वप्नं दाखवले तरी मूर्दाड व्यवस्था बदलायला तयार नाही. त्याचे भोग सर्वसामान्यांना भोगावेच लागतात. शौचालयांबद्दलचं देशातलं भेदक वास्तव लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं. त्यानंतरही वास्तव बदलायला तयार नाहीय. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कार्यालयात शौचालयाअभावी एका तरुणीला नरकयातना भोगाव्या लागल्यात.

केंद्र सरकारच्या एका कार्यालयातच टॉयलेटची एक भयकथा समोर आलीय. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळच्या वेस्टर्न कोल फिल्डच्या खाणीत लघुशंकेसाठी गेलेल्या 24 वर्षाच्या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या या निर्भयाची रुग्णालयात जगण्यासाठी झुंज सुरू आहे.

या सगळ्यावर नागपूरकरांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहराच्या रस्त्यावरचा जनतेनं आक्रोश केलाय तो निर्भयाला न्याय देण्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी साधं शौचालयही नसल्यानं हा अनर्थ घडल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केलाय.

दरम्यान केंद्र सरकारच्या कार्यालयात शौचालयाची ही अवस्था असेल तर खासगी क्षेत्रातली परिस्थिती काय असेल याची कल्पनाच न केलेलीच बरी. या धक्कादायक प्रकारानंतर मंत्री महोदयांनी कारवाईचं टुमणं वाजवलं. पण कनिष्ठ लोकांना बळीचा बकरा बनवून वरिष्ठांची पाठराखण केला जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.

निवडणुकीच्या बाजारात प्रत्येक राजकारणी विकासाच्या नावानं घसा कोरडे करतो. मात्र मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावाचा फायदा घेत असे हैवान आज गल्लोगली फिरतायत. त्यामुळे भरदिवसा आपल्या आया-बहिणींच्या अब्रुच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि ही षंढ व्यवस्था डोळे वासून पुन्हा वाट पाहत राहते.

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपूर पासून ४० किलोमीटर दूर असणाऱ्या उमरेड मधील गोकूल ओपन कास्ट माईन मध्ये वे ब्रिज विभागात काम करणारी महिला दुपारी लघुशंकेसाठी गेली असता बराच वेळ परत न आल्याने सहकाऱ्यांनी तिचा शोध घेतला. तेव्हा बाहेरच्या झाडांमध्ये ही २६ वर्षीय महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली.

या महिलेला चार ते पाच जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याठी तिच्या डोक्यावर दगड मारला. हा दगडाचा मार इतका जोरात होता की महिलेच्या चेहेऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. पीडित महिलेच्या दोन्ही डोळ्यांना मार लागला आहे. खाणीत येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर पैकी कुणी हे अमानुष कृत्य केलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

 PHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा !

First published: August 23, 2018, 8:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading