वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून मारहाण

वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून मारहाण

नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या अमानुष घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडालीय.

  • Share this:

नागपूर,ता.14 ऑगस्ट : नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर माहिती बाहेर येवू नये म्हणून आरोपींनी पीडीत महिलेला दगडाने ठेचून मारहाण केल्याची संतापजनक कृत्यही त्यांनी केलं. या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडीत महिलेला नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. नागपूर पासून ४० किलोमीटर दूर असणाऱ्या उमरेड मधील गोकूल ओपन कास्ट माईन मध्ये वे ब्रिज विभागात काम करणारी महिला दुपारी लघुशंकेसाठी गेली असता बराच वेळ परत न आल्याने सहकाऱ्यांनी तिचा शोध घेतला. तेव्हा बाहेरच्या झाडांमध्ये ही २६ वर्षीय महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली.

विमानात तडफडत राहिला भारतीय तरूण, पण पाकिस्तानने दिली नाही डॉक्टरांची मदत

Independence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा !

या महिलेला चार ते पाच जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याठी तिच्या डोक्यावर दगड मारला. हा दगडाचा मार इतका जोरात होता की महिलेच्या चेहेऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. पीडित महिलेच्या दोन्ही डोळ्यांना मार लागला आहे. खाणीत येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर पैकी कुणी हे अमानुष कृत्य केलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

महिलेची ओळख पटू नये म्हणून आरोपीने हे कृत्य केले असल्याचे माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. दरम्यान या महिलेला पुढच्या उपचारासाठी नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित महिलेवर योग्य ते सर्व उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

VIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस !

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे चेअरमन राजीव रंजन मिश्रा यांनी आरोंज सिटी हॉस्पिटल भेट देऊन पीडितेची विचारपूस केली. दरम्यान या प्रकरणात काही टीम्स् नागपूर पोलिसांनी तयार केल्या असून आरोपींचा शोध सुरु आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे ही बाब उजेडात येताच सर्वत्र धावपळ सुरू झाली.

 

First published: August 14, 2018, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading