Home /News /maharashtra /

2 कप चहा पडला दोन लाखांना; जालन्यातील तरुणासोबत घडलं भलतंच

2 कप चहा पडला दोन लाखांना; जालन्यातील तरुणासोबत घडलं भलतंच

जालना जिल्ह्यातील बदनापूर याठिकाणी एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. (File Photo)

जालना जिल्ह्यातील बदनापूर याठिकाणी एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. (File Photo)

Crime in Jalna: जालना जिल्ह्यातील बदनापूर याठिकाणी एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे.

  बदनापूर, 15 सप्टेंबर: जालना जिल्ह्यातील बदनापूर याठिकाणी एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. येथील एक तरुण आपल्या दुचाकीच्या डिकीतून जवळपास दोन लाखांची रक्कम घेऊन जात होता. दरम्यान वाटेत असणाऱ्या एका चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी (Went for tea) थांबलं असता, एका अज्ञात व्यक्तीनं फिर्यादीच्या 1 लाख 90 लाख रुपयांवर डल्ला (1.90 lakh theft) मारला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodge) करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मिर्झा जावेद बेग इलियास असं फिर्यादी व्यक्तीचं नाव आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता बदनापूर शहरात घडली आहे. दरम्यान फिर्यादी मिर्झा जावेद बेग इलियास आपल्या एका मित्रासोबत चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीजवळ कोणीच नसल्याचं पाहून एका अज्ञात चोरट्यानं दुचाकीच्या डिकीतील 1 लाख 90 हजार रुपये लंपास केले आहे. मित्रासोबत चहा पिऊन फिर्यादी दुचाकीजवळ आले असता, डिकीतील रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. अवघा दोन कप चहा त्यांना जवळपास दोन लाखांना पडला आहे. हेही वाचा- नदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना याप्रकरणी मिर्झा यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली आढळतात याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Theft

  पुढील बातम्या