मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

25 वर्षांपूर्वी घर सोडलं अन्...; उच्च शिक्षित मिलिंद तेलतुंबडे नक्षली चळवळीकडे कसा वळला?

25 वर्षांपूर्वी घर सोडलं अन्...; उच्च शिक्षित मिलिंद तेलतुंबडे नक्षली चळवळीकडे कसा वळला?

मिलिंद तेलतुंबडे याचं यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजुर ईजारा येथील घर...

मिलिंद तेलतुंबडे याचं यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजुर ईजारा येथील घर...

काल गडचिरोलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत एकूण 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत उच्च शिक्षित नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे (milind teltumbade) यालाही ठार करण्यात आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

यवतमाळ, 14 नोव्हेंबर: काल गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जंगलात भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत एकूण 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत उच्च शिक्षित नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे (milind teltumbade) यालाही ठार करण्यात आलं आहे. 1996 मध्ये गाव सोडून गेलेला मिलिंद गावात पुन्हा परतलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. मिलिंदला पकडून देण्याऱ्यांना तीन राज्यांनी मिळून 2 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे हा उच्च शिक्षित होता. त्याचं सातवीपर्यंतचं शिक्षण यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर तो पुढील शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मिलिंद हा तेलतुंबडे दाम्पत्याचं सहावं अपत्य होता. काल झालेल्या चकमकीत मिलिंदचा मृत्यू झाल्यानंतर, गावकऱ्यांशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मिलिंदबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा-VIDEO: मंत्रालयाच्या गेटवर ST कर्मचारी भगिनींचा आक्रोश; आत्मदहनाचा केला प्रयत्न

काल गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिसांची सात पथकं शोध अभियान राबवत होते. यावेळी काही नक्षलवाद्यांनी अचानक सी 60 पोलीस पथकावर गोळीबार केला. या चकमकीला पोलिसांनी योग्य ते प्रत्युत्तर दिलं असून 26 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. यामध्ये नक्षली संघटनेचा मोठा नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद तेलतुंबडे यालाही मारण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हेही वाचा- Gadchiroli : मोठी बातमी, चकमकीत माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजुर ईजारा येथील मूळचा रहिवासी असलेला मिलिंद हा उच्च शिक्षित होता. त्यानं कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळवला होता. अगदी लहान पणापासून मिलिंद अतिशय हुशार होता. त्याने एक वर्ष WCL मध्ये नौकरी देखील केली आहे. पण त्यानंतर नोकरीत मन लागलं नाही म्हणून त्याने आयटक युनियनचं काम सुरू केलं. या युनियनमध्ये तो सेक्रेटरी होता. दरम्यानच्या काळात त्याने वणी भागात कामगार संघटना वाढवली. पुढे तो नक्षली चळवळीत सक्रिय सहभागी झाला. 1996 साली घर सोडलेला मिलिंद परत घरी आलाच नाही.

First published:

Tags: Gadchiroli, Naxal Attack