कोल्हापूरमध्ये विहीर खचली, एका मजुरासह 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले

कोल्हापूरमध्ये विहीर खचली, एका मजुरासह 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं विहीर खचली असल्याची बातमी आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 09 मे : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं विहीर खचली असल्याची बातमी आहे. विहीर कोसळून एका मजुरासहित 4 जण ढिगाऱ्याखाळी गाडले गेले असल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघा जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. पण आणखी दोघे तिघे अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. अचानक विहिरीचा काही भाग खचल्याने काम करत असलेले मजूर ढिगाऱ्याखाली अडकले.

स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी मदतकार्य सुरू केलं. दोन जेसीबी आणि एका क्रेनच्या साहाय्याने मदतकार्य अद्यापही सुरू आहे. विहिरीचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिकांना पोलिसांनी दिली.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की ही विहीर खूप मोठी होती. काम सुरू असल्यामुळे मातीचे अनेक ढिगारे होते. त्याचखाली काही मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

First published: May 9, 2020, 9:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या