• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ठाण्यात वीकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार, पोलीस आयुक्तांनी सांगितले नवे नियम

ठाण्यात वीकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार, पोलीस आयुक्तांनी सांगितले नवे नियम

शनिवार-रविवार हे दोन दिवस संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown in Thane) जाहीर करण्यात आला असून या दोन दिवशी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल.

  • Share this:
ठाणे, 9 एप्रिल : आठवडाभर ठाणे जिल्ह्यात दिवसा काही तास संचार करण्यास परवानगी होती, तर खासगी वाहनांनी बाहेर पडण्यास मुभा होती. मात्र पुढील दोन दिवस म्हणजेच शनिवार-रविवार हे दोन दिवस संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown in Thane) जाहीर करण्यात आला असून या दोन दिवशी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल. जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत, त्यांनी हॉल तिकीट जवळ बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.एवढंच नाही तर शनिवार आणि रविवारी खासगी वाहनांना पूर्णतः बंदी असून विनाकारण खासगी वाहन रस्त्यावर दिसल्यास ती वाहने जप्त देखील केली जाऊ शकतात. मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक किंवा कोणत्याही कारणाविना रस्त्यावर फिरताना जर कोणी दिसले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये ठाण्यात आणखी कोणते नियम असणार? अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही सेवा सुरू ठेवल्यास त्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावा लागेल आणि जर कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल किंवा मेडिकलमधून काही औषधे आणायचे असतील, तसंच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची असेल तर शासनाने दिलेल्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते, असे देखील यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्पष्ट केले. हेही वाचा - मुंबईत weekend lockdown मध्ये कसे असणार नियम? महापालिकेने जारी केल्या नव्या सूचना पाळीव प्राण्यांची खाद्याची दुकाने दवाखाने सुरू राहणार असून जर अगदीच गरज असेल, तरंच पाळीव प्राण्यांच्या मालकांनी बाहेर पडावे. ठाणेकर सुज्ञ असून सर्व नियमांचे पालन करतील पण जर कोणी नियमांचे उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्याशिवाय पोलिसांना पर्याय उरत नाही, त्यामुळे सर्व नागरिकांना घरी राहण्याचा, आपल्या कुटुंबासोबत पुढील दोन दिवस वेळ घालवण्याचं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलं.
Published by:Akshay Shitole
First published: