मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weather Update: या दिवसापासून सुरू होणार मान्सूनचा परतीचा प्रवास; आज राज्यात कशी असेल पावसाची स्थिती?

Weather Update: या दिवसापासून सुरू होणार मान्सूनचा परतीचा प्रवास; आज राज्यात कशी असेल पावसाची स्थिती?

फाईल फोटो

फाईल फोटो

आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली स्थिती वायव्य भारतात तयार होत असल्याचे IMD ने म्हटलं आहे. येत्या तीन दिवसांत यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो (Weather Update)

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 19 सप्टेंबर : यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार अशी चर्चा सुरू होती मात्र मान्सून जुलै महिन्यात सुरू झाला. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे चर्चा होती. आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली स्थिती वायव्य भारतात तयार होत असल्याचे IMD ने म्हटलं आहे. वायव्य भारतात पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर, बंगालच्या उपसागरात 20 सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याच्या प्रभावामुळे राज्यात आणखी काही दिवस पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत. Monsoon Update : हा परतीचा पाऊस नाहीच, मान्सूनबाबत हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती पालघरच्या किनारपट्टी भागात सध्या मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस पुढे 2 तास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण असून गेल्या 24 तासात याठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी अधून-मधून सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पश्चिम राजस्थानसह पंजाब, हरियाणा, दिल्ली याठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या अनुकूल स्थितीमुळे तीन दिवसांत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. Nashik Leopard Video : नारळाच्या झाडावर दोन बिबट्याची झुंज.. झुंजीचा थरार मोबाईलमध्ये कैद.. Video गतवर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता, हा मान्सून 25 ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. यंदा सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. तर, नियमित वेळेच्या सहा दिवस आधीच पावसाने देशभरात हजेरी लावली होती.
First published:

Tags: Rain, Weather update

पुढील बातम्या